Sangeeta Gruha Udyog – Mrs. Sangeeta & Mr. Ramdhan, Pune

Posted by Sahil, 20 Jul 2014

I guess the picture below is giving a delicious start to the story.

It takes a lot of efforts to prepare the shown dish in picture, you can check the efforts required with your mother or wife. The two names mentioned at the start are trying to reduce this time span for the house wives in Pune for last 13 years.

The Brand Sangeeta was established by Mr. Ramdhan & his wife Sangeeta in year 2002. The start for the business was definitely not easy. The progress was full of mistakes and learning.

The brand Sangeeta is supplying Pune with different instant flours such as Idli, Dosa, Dhokala, Moongbhaji, etc. The journey which started with a single product today reached a number of 20.

I am not talented enough to translate the below words written by Mr.Ramdhan himself in a newspaper.

ज्याचं त्यालाच निस्तराव लागतं....

“ज्याचं त्यालाच निस्तराव लागतं, तुझ निस्तरायला मी येनार नाही“, हे कडवट बोल काना वर पडताच क्षणभर मती गुंग झाली; पण आपला मित्र उगाच अस बोलणार नाही, ही खात्री असल्यामुळे, मी लगेच भानावर येऊन त्याच पावली घरी आलो.

पाच-सहा वर्षापूर्वीची हि आठवण आजही ताजी आहे. तो बाजारपेठेतील मंदीचा काळ होता. भाऊबंदिकीमुळे वडील अचानक अज्ञातवासात गेलेले. शनिवार पेठेतील माझ्या दुकानापुढे तीन महिने लांब-रुंद व खोल खड्डा खणून ठेवलेला, त्यामुळे ग्राहकांचे येणे थांबलेले. कोर्टकचेरीत अमाप पैसा गेलेला. भाड्याची राहती जागासुद्धा सोडावी लागली. घरखर्च, बँकेचे हफ्ते यांचा मेळ बसेना. पेट्रोल भरून दुचाकी चालवण्याइतकेही धैर्य होईना. दूर कुठेतरी पळून जाण्याचे किंवा आत्महत्या करण्याचे विचार रेंगाळू लागले. हे सर्व एक वर्ष चालले. घर व दुकान विकून गावी आपल्या आजोळी जाऊ, असे बायकोला बोलून दाखवले. एकदा तर परिस्थिती फारच हाताबाहेर जाऊ लागलेली आहे, मुलगा भ्रमिष्टासारखा करतो आहे, असे वाटताच आईने स्वतःचे मंगळसूत्र विकून सोळा हजार हातावर ठेवले. त्या वेळी ते कोटीमोलाचे वाटले. बाकीचे दागिने घर, दुकान घेताना या पूर्वीच विकले गेले होते. माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. बायको तिच्या परीने धीर देत होती. तिने मला माझ्या जिवलग मित्राला भेटण्याचा सल्ला दिला. मी त्याच्याकडे गेलो खरा; पण फर्निचर व्यवसायिक असल्याने त्याचा एकेक मिनिट मोलाचा होता. त्याला माझ्या अवस्थेची थोडीफार कल्पना होती. त्या वेळी त्याने सुरवातीला नमूद केल्याप्रमाणे सुनावले. मी विषण्ण मनाने घरी आलो खरा; पण माझा मित्र सांगतोय, तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असावे, असे माझे मन सांगू लागले. त्याचे माझ्याशी कधीतरी झालेले बोलणे आठवले, “अरे राजा, खाद्य उत्पादनात पड. गुणवत्ता अशी हवी, की जगात नाव झाले पाहिजे.” त्याचवेळी आमच्या शेजाऱ्यांनीही खूप धीर दिला. त्यांनीही खाद्यपदार्थांच्या उत्पादनाचा व्यवसाय करावा असे सुचवले. माझे विचारचक्र सुरु झाले. बाजारात व परदेशात इडली, ढोकळा इत्यादी इन्स्टंट पिठांना मागणी होती. सर्वप्रथम मी माझा व्यायाम पूर्ववत सुरु केला. ‘रमणबाग’ शाळेत असताना मला रसायनशास्त्रात फार गोडी होती व बीएमसीसी कॉलेजमध्ये बुद्धीबळाचा मी कॅप्टन होतो. या दोन्ही गोष्टीचा मला पुढील आयुष्यात फार उपयोग झाला. मेहुणे व भाऊ यांनी आर्थिक साह्य केले. त्या जोरावर सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर इडली, उत्तपा इ. चौदा प्रकारची इन्स्टंट पीठे ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, अशी तयार झाली. संगीता हा ब्रान्ड तयार केला, आवश्यक ते परवाने घेतले.

सुरवातीस कच्चा माल पुरवणार्यांनी फसवले. आम्ही ग्राहकांना माल बदलूनही दिला; पण यात आम्हाला थोडेफार आर्थिक नुकसान सोसावे लागले. लहानसहान प्रदर्शनातून माल विकण्यास सुरवात केली. यानंतर खरा सुवर्णकाळ सुरु झाला, तो ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ मुळे. तिथे ‘इन्स्टंट’ ची मोठ्या प्रमाणावर विक्री व जाहिरात झाली. आमच्या व्यवसायाची पक्की पायाभरणी झाली. त्याकाळी आम्ही सर्व घरदार विकायला चाललो होतो; पण आता आम्ही चार खोल्यांची सदनिका हफ्त्यावर घेतली आहे. सर्व सुरळीत चालू आहे.

कधीकाळी आत्महत्येचा विचार मनात आलेल्या माणसाने मित्र, नातेवाईक, शेजाऱ्यांनी साथ दिल्यानंतर घेतलेल्या उभारीची हि कहाणी.

रामधन श्रीकिसन बूब

The people who understand Marathi, would have understand that Mr. Ramdhan has a quality hand on writing as well.

The two people are still stuck to the one-liner used in their brand logo; 'Quality is our aim'.

The growth for Sangeeta Gruhaudyog is consistent from the day it was started. We will wish them for their bright future.

Contact Website : http://www.sangeetagruhaudyog.com