मनमोकळ

Posted by Sahil, 17 March 2015

I am sharing a very good collection of small poems - चारोळी from my friend Sachin.

I hope you will like it and share.

Image Credits :

Tiny Little Squares of Learning...    and    Sanketh's Photography - SP

जग माझ तुझ्यापर्यंत; जगातही फक्त तू,
तूच माझ सर्वस्व आणि शून्यही माझ तूच ...

सुरवात माझी तुझ्यापासून, शेवटातही फक्त तू,
जगण्यामधला आनंद व मृत्यूनंतरचा मोक्ष तूच ...!!!
कविता मी करत नाही, कविता माझ्याकडून लिहिली जाते,
आणि कवितेतही मी तेच लिहितो, जे कि मला तुझ्यात दिसते ...!!!
रम्य पहाटेच्यावेळी सखे तू लाजलीस,
तुला लाजताना बघता बघता गुलाबाची कळी उमलली ...!!!
ती दूर गेल्यापासून माझ्या जीवनवृक्षाची पानगळ झाली,
ऐण बहराच्या काळात कोवळी पाने गळून पडली ...!!!

‘ती’ च माझे सर्वस्व होती, तीच मला सोडून गेली,
माझ्यासाठी तर आता, माझी सावली सुध्दा परकी झाली ...!!!
मन जर दृश्य असत, तर बर झाल असत,
तिच्याविना तडफडणार माझ मन,
तिच्या मनात नाही, ... पन डोळ्यात तरी भरल असत ...!!!
तुला कधीच कळणार नाही, प्रेम म्हणजे काय असत,
कारण काट्यांना कधीच कळत नाही, फुल किती नाजूक असतं ...!!!
जीवनाच्या वाटेवर चालताना, बऱ्याच वेळा मी वाट चुकतो,
मधेच एखादा चकवा मला, पुन्हा पुन्हा तुझ्याशीच नेवून सोडतो ...!!!
अशी कशी ही कातरवेळ, सखे आपल्या नात्याची,
ना धड दिवस मैत्रीचा, ना सुगंधी रात्र प्रेमाची ...!!!
दिवस मावळतीस जाण्यापरी, सूर्यपाकळी मिटते आहे,
सत्याचा तेजोमय साक्षीदारही, अंधकारापुढे झुकतो आहे ...!!!

चांगल्या गोष्टीची सुरवात हि नेहमीच व्यर्थ असते,
कारण सुरवात हीच ... शेवटचा पहिला टप्पा असतो ...!!!
हल्ली मला दु:ख झालं, तर दु:खालाही वाईट वाटत,
माझी दु:ख बघताना, त्यालाही मग रडू कोसळत ...!!!
आयुष्याचे हे कोडे मला कधीच नाही उलगडले,
अंगावर माझ्या फुले बरसली,
मग पायांखाली.. फक्त काटेच का मिळाले ...???
फुले कितीही सुंदर असले तरी मला मात्र काटा बनावेसेच वाटते,
कारण काट्यांना कधीच, कोमेजण्याची भीती नसते ...!!!
जीवन म्हणजे नेमकं काय? या बाबत बरेच प्रघात आढळतात,
माझ्या भाषेत मात्र,
जन्म आणि मृत्यू यामधील अंतरालाच जीवन असे म्हणतात ...!!!

या प्रश्नाचा खूप त्रास होतो, म्हणून मी याचा विचार करत नाही,
‘मी का म्हनून जगतोय ???’ हेच मला कळत नाही ...!!!
वो फुल ही क्या, जिसमे खुशबू ना हो,
वो दिल ही क्या, जिसमे प्यार ना हो,
हम तो सिर्फ आपकोही चाहते है,
पर वो चाहत ही क्या, जिसका इकरार ना हो ...!!!

नकळतच माझा हाथ पकडून, पावसात तुझ चिंब भिजण,
अचानक आभाळी वीज चमकता घाबरून तुझ मला घट्ट बिलगण,

माझ्या स्पर्शाच्या ओलाव्याने तुझ मन भिजेल का?
आपल्या नात्यातलं गुलाबी कोडं, सखे तुला उलगडेल का ...???
मातीचा गंध श्वासात भरून, गंधात तुझ हलकेच मिसळण,
तू मिसळताच गंधामध्ये निसर्ग सारा बहरून जाण,

माझ्या श्वासातला तुझा सुगंध, तुला कधी जाणवेल का?
आपल्या नात्यातलं गुलाबी कोडं, सखे तुला उलगडेल का ...???

सायंकाळची शांत वेळ, सार काही शांत असण,
मी शांत तू शांत, तरीही मुक्त संचार असण,

माझ्या ओठांवरच्या शांततेची हाक तुला ऐकू येईल का?
आपल्या नात्यातलं गुलाबी कोडं, सखे तुला उलगडेल का ...???

YOU MAY ALSO LIKE