हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

Posted by Sahil, 6 Sept 2014

The poem will become very special to many of you.

It is small and simple, and tells you what generally happens with people in love; in a comic way.

It was written around in 1960s or may be before to that as well.

Hope you people will like it.

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

आम्ही तुमच्याकडे बघायचं, तुम्ही आमच्याकडे बघून न बघित्यासारखं करायचं;

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

तुम्ही शिकण्यासाठी शाळेत यायचं, आम्ही तुमच्यासाठी शाळेत जायचं;

शाळा सुटल्यावर तुम्ही घरी जायचं, आम्ही तुमच्या पाठी पाठी जायचं;

दिवसभर आम्ही तुमच्या गल्ली-बोळातून फिरायचं;

तुम्ही गच्चीत उभे राहून उगीचच आमच्याकडे बघायचं;

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

अचानक तुमचं लग्न ठरायचं, तुम्ही आम्हाला लग्नाला नाही बोलवायचं;

तरीपण आम्ही लग्नाला यायचं, कचकून खायचं, दचकून रडायचं;

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

एके दिवशी तुम्ही सासरहून माहेरी यायचं; तुमच्या कडेवर बाळ असायचं;

बाळ आमच्याकडे पाहून गुलू-गुलू हसायचं;

आणि बाळाला तुम्ही हळूच विचारायचं, “बाळा, मामांकडे जायचं????”

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

हे असचं चालायचं ... हे असचं चालायचं ...

YOU MAY ALSO LIKE